⚡सावंतवाडी ता.३०-:
भटवाडी-निरुखेवाडी येथील पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतः खर्चातून ते खड्डे बुजवून डागडूजी केली. यामुळे वांधारकांनी समाधान व्यक्त केले.
भटवाडी-निरुखेवाडी येथीलपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे देखील शक्यता होती. ही शक्यता बघता सामाजिक बांधिलकी ठेऊन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतः खर्चातून ते खड्डे बुजवले.
यावेळी अभिजीत तिळवे, बबन डिझोजा, दिपक हिरलेकर, राजू गोवेकर, बबलू डिसोजा आदी उपस्थित होते.
