ओटव – नांदगाव प्रशालेने राबविला उपक्रम
⚡कणकवली ता.२९-: जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता – घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला.
भारत हा देश शेती प्रधान आहे.देशातील ९०% लोक शेतीवर आपली उपजिविका करतात.सहाजिकच बालवयात शेतीविषयी ची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी शेतीचे धडे गिरवून आधुनिक शेतीकडे वळतील असा विश्वास शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दिप्ती परब यांनी व्यक्त केला.यावेळी मुख्याध्यापक आनंद तांबे ,सहकारी शिक्षिका रूपाली हुंन्नरे, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
