समुद्र किनारी वाहून आलेल्या जखमी कासवाला जीवदान

⚡मालवण ता.२७-: वायरी मोरेश्वर येथे समुद्र किनारी लाटांच्या जोराने वाहून आलेल्या जखमी कासवाला स्थानिक नागरिक व वन विभाग अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जीवदान देण्यात आले.

वायरी मोरेश्वर वाडी येथे आज सकाळी समुद्री लाटांच्या जोरामुळे एक ऑलिव्ह रिडले कासव किनाऱ्यावर आल्याने स्थानिक नागरिक उपेंद्र ढोके यांनी विराज तोडणकर याच्या साहाय्याने या कासवाला पुन्हा समुद्रात सोडले. मात्र सायंकाळी हे कासव पुन्हा किनाऱ्यावर आल्याने याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या कासवाला जखम झाल्याचे दिसून आले. वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक शरद कांबळे, वनकर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर यांनी किनाऱ्यावर दाखल होत या कासवाला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी मालवण डॉ. दळवी साहेब यांच्याकडे या कासवावर उपचार केले. त्यानंतर हे कासव तारकर्ली एमटीडीसी येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

You cannot copy content of this page