ग्रामस्थांचे गोळवण ग्रामसेवकांना निवेदन
⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील बागायत गुरामवाड ते पोईप मुख्य रस्ता ते जुने शासकीय रुग्णालय, गोळवण ते खांदी सावरवाड या रस्त्यावरील मोरी काढून टाकण्यात आली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी या मोऱ्या का काढून टाकण्यात आल्या? असा सवाल उपस्थित करत मोऱ्या तात्काळ घालून देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना दिले आहे.
या मोऱ्या चोरीला गेल्या आहेत का? व कशा? एमआरजीएसमधून काम करताना त्या मोऱ्या घातल्या होत्या. त्या काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे आमच्या घराजवळ येणारी वाहूतक बंद झाली आहे. येथील रहिवासी प्रकाश नाईक, मयुर नाईक, सुभाष दत्तात्रय सामंत यांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती असून त्या आजारी आहेत. योग्य कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्याचा इशारा भाऊ चव्हाण, मयूर नाईक, स्नेहा नाईक, प्रकाश नाईक, राणी नाईक, सुभाष सामंत या ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
