कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील शिवसेना व भाजपाच्या प्रत्येकी १० अशा एकूण २० पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या नोटिसामध्ये तसा उल्लेख करत कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी या नोटिस काढल्या आहेत.


राज्यात शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत असतानाच राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात आंदोलन, मोर्चे व निषेध आदी आंदोलनात्मक स्वरूपात पावले राजकीय पक्षांकडून उचलली जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता या नोटिसा देण्यात आल्याची माहिती हुलावले यांनी दिली. दरम्यान काल कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर फटाके फोडत पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाल्याबद्दल जल्लोष केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना घेत नोटिसा बजावण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.

You cannot copy content of this page