⚡मालवण ता.२७-: पर्यावरण रक्षणाच्या व संवर्धनाच्या दुसजतीने वृक्षलागवड ही सध्याच्या काळाची महत्त्वाची गरज बनली असून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेत पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने झाड आणून शाळेच्या आवरातच या झाडांची लागवड केली.
शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्सालवीस व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या निसर्ग जपणुकीसाठी प्रवृत्त करत मार्गदर्शन केले. शालेय परिपाठावेळी वृक्षांचे महत्त्व या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना झाडे लावणे व संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव करून दिली गेली. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
