बंडखोर सामंत, केसरकर यांना न दुखवता आमदार नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’…

मनसेचे अमित इब्रामपूरकर यांची टीका..

⚡मालवण ता.२७-: बंडखोर सामंत,केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. वैभव नाईक शिवसेनेचे सर्व आमदार जरी गेले तरी मी शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत आहेत. .सेनेच्या कार्यकर्त्याना स्वतः फटाके देऊन,गाडीतून झेंडे,बॅनर नेऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत.

पण अन्य जिल्ह्यांमध्ये सेनेत गद्दारी केलेल्यांचा निषेध, शाई फेक, जोडे मारो, पुतळे जाळणे अशी आंदोलने होत असताना जिल्ह्यातील सेनेच्या बंडखोरांबाबत चकार शब्दही काढत नाहीत किंवा साधा निषेधही करत नाहीत. शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांच्याबाबतही बोलत नाही. फक्त आपला सत्कार घडवून आणतात याच गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोर आमदांना त्यांच्या सोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत.जे शिवसेनेशी गद्दारी करीत आहे.त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार नाहीत अशी संतप्त भावना इतर जिल्ह्यांमध्ये आहे.पण सिंधुदुर्गात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एक आमदार शिंदे गटात सामील झाला तरी आमदार नाईक फक्त आपण निष्ठावंत असल्याचाच ढोल बडवत आहेत.

You cannot copy content of this page