कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा समीर नलावडे यांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कणकवली गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा ही दहावी उत्तीर्ण झालेली पहिलीच विद्यार्थिनी आहे. या उज्ज्वल यशाबद्दल नगराध्यक्ष नलावडे यांनी कणकवली नगरपंचायतच्या वतीने शिल्पा हिचे अभिनंदन केले. शिल्पा हिला पुढील शिक्षणासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण करणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. यावेळी कातकरी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शांताराम पवार , राजू गवाणकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page