तालुका भाजप महिला मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी*
*💫सावंतवाडी दि.१९-:* एका महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून अशा मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याने जनतेला कायदा आणि पोलीस प्रशासनवर विश्वास राहणार नाही. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपादाचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी सावंतवाडी तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, नेत्रा मूळ्ये, प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष अवंती पंडित, मेघना साळगांवकर, मिसबा शेख, निर्मला यादव, प्राजक्ता मुद्राळे, सुकन्या टोपले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. संबंधित महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांना ११ जानेवारी रोजी निवेदन दिले होते. परंतु पोलिसांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. कोणतीही महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली तर त्वरित तक्रार दाखल करावी असे केंद्र सरकारचे निर्देश असताना देखील केवळ राजकीय दबावापोटी हि केस खोटी आहे, असे कारण देवून पोलीस सदर केस नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप भाजप तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून आपले पिडीत महिलेशी परस्पर संमतीने विवाह बाह्य संबंध असून सदर नात्यातून मला एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये असून त्यांना मी माझे नाव दिले आहे. व हा सर्व प्रकार माझ्या लग्नाच्या पत्नीला व मुलांना माहिती आहे. असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या फेसबुकवरील वक्तव्यावरून त्यांना एकूण पाच अपत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची वस्तुस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोगाची व पर्यायाने जनतेची फसवणूक केलेली असल्याने त्यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
