आंबोली, चौकुळ येथे सरपंच आरक्षण पडण्यावर पुढील रणनीती अबलंबून

*💫आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -:* आंबोली, चौकुळ गावात भाजपने एक हाती सत्ता मिळवून विजयाचे कमळ हातात घेतले आहे. विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना कमी पडल्याने जनमत भाजपच्या पारड्यात पडले आहे. त्यामुळे शिवसेनेला आंबोली, चौकुळ येथील ग्रामपंचायत सत्ता गमवावी लागली आहे. आता आंबोली आणि चौकुळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच आरक्षण पडण्यावर पुढील विकासाची भाजपची रणनिती अवलंबून असणार आहे. चौकुळ,आंबोली ग्रामपंचायतचा नियोजन आराखडा पाच वर्षांपूर्वी पासूनच तयार असून, आता याच संधी चा फायदा घेऊन भाजपला काम करायचे आहे. आंबोली हे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असुन या ठिकाणची ग्रामपंचायत पुढील वाटचालीस महत्त्वाची आहे. सर्व पर्यटन पाँईट चे अंतर्गत रस्ते विकसित करणे, पाँईट सुशोभित करणे. याकडे लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी प्रयत्न करणे. रस्ते, पाणी, वीज याचे नियोजन करून एक नवीन आंबोली संकल्पना तयार करून राबवण्याची गरज आहे.

You cannot copy content of this page