*💫मालवण दि.१९-:* मालवण बेळणे कणकवली मार्गावरील मसुरे भोगलेवाडी तिठा येथे मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात वडाचापाट बौद्धवाडी येथील किरण रामचंद्र कासले येथील मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली कासले याच्या डोक्याला दुखापत झाल्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडाचापाट बौद्धवाडी येथील किरण रामचंद्र कासले ( वय ३२ वर्ष) हे मोटारसायकल ( एमएच ०७-एएई ३१२४) घेऊन मालवण ते वडाचापाट असा प्रवास करत होते. तीव्र स्वरूपाच्या उतारावर भोगलेवाडी तिठा येथे त्यांची मोटारसायकल घसरून मंगळवारी दुपारी १.३०च्या सुमारास सदर अपघात झाला. यावेळी किरण यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने ते रस्त्यातच पडले होते. त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला आहे. अपघाताची घटना समजताच बागायत येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी स्वप्नील धामापूरकर, अमित बागवे, सूरज धामापूरकर तसेच ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलीस स्थानकात नोंद नव्हती
मोटारसायकल अपघातात युवक गंभीर जखमी…
