संशयित दोन आरोपी विरूद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.१९-:* कुडाळ येथून कुणकेरी येथे जात असताना रामचंद्र गोसावी यांच्या गाडीचे किरकोळ कारणावरून शाहिद शेख आणि अजेज शेख या दोन व्यक्तीनी नुकसान केले आहे. हा प्रकार काल मध्यरात्री नंतर घडला आहे. याबाबत रामचंद्र गोसावी यांनी आज सावंतवाडी पोलिस स्थानकात दोन्ही आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. यावरून संशयित आरोपी शाहिद शेख व अजेज शेख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
