धान्य व केरोसीन संघटनेचे आयोजन
मालवण:
सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन संघटनाचे कार्यकारणी सदस्य तसेच मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष श्री.सुनील नारायण मलये यांचे रिक्षाअपघातात शनिवार दिनांक १८ जून २०२२ रोजी सायंकाळी गोवा बांबुळी येथे उपचार चालू असतानाच दुखःद निधन झाले त्यानिमित्ताने मालवण तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने सोमवार दिनांक २७ जून २०२२ रोजी दुपारी १२ वा. ३० वा.
जानकी हॉल कुंभारमाठ मालवण (शिवाजी महाराज पुतळ्यानजीक) या ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी या शोकसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान्य दुकानदार व केरोसीन दुकानदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन संघटना जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर तसेच मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना कार्यकारणी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
