जाधववाडीतील रहिवाशांना घेऊन प्रांताधिकाऱ्यांना भेटण्याचा दिला इशारा
⚡सावंतवाडी ता.२६-: :काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिमखाना येथील वरच्या भागावर राहात असलेल्या जाधववाडी येथील 11 घरं सध्यास्थितीत कोसळत असलेल्या घळणीच्या अवघ्या पंधरा फुटाच्या अंतरावर येऊन पोचली आहेत, याची तत्काळ पाहणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली असता ठेकेदाराला बोलवून त्या ठेकेदाराला खडेबोल सुनावले व उद्या अकरा वाजता प्रांताधिकारी यांच्यासमोर हजर राहावे अशी सक्त ताकीद दिली आहे.
तर आजच्या परिस्थितीमध्ये जाधववाडीतील सुमारे 11 घर आज धोक्याच्या विळख्यात सापडली आहेत, ही परिस्थिती आणीबाणीची आहे असे असूनही प्रशासन यासंदर्भात अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. ही वस्ती मागासवर्गीयांची असल्यामुळे नगरपालिका प्रशासन गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तीन-चार वर्षांपूर्वी या वस्तीच्या सुधार कामासाठी मंजूर झालेली निधी दुसऱ्या कामाकडे वळवण्यात आली होती असं तेथील रहिवासी सांगत आहेत आणि आजच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर जाधव वाडीतील लोकांची घरे कधीही खाली कोसळून शकतात कारण अजूनही घळण कोसळण्याची प्रक्रिया सुरू आहे तर आज सकाळी घळणीवरील काही झाडे मुळासकट मोडून स्लॅपवर कोसळली या सर्व वस्तुस्थितीची पाहणी करून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली व उद्या अकरा वाजता सर्व जाधववाडी तील रहिवाशांना घेऊन प्रांताधिकाऱ्यांना भेटण्याचा इशारा दिला आहे.
