सावंतवाडी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात येणार सन्मान

⚡सावंतवाडी ता.२४-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने 25 जुन 22 रोजी सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार ही करण्यात येणार आहेत.

या मंडळाचे अध्यक्ष बंटी उर्फ वैभव माठेकर, मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या उर्फ रवींद्र तोरसकर, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन पाटील कॉम्प्लेक्स वेंगुर्ले बस स्टॅन्ड समोर दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये करण्यात आलेले आहे. तरी सावंतवाडी शहरातील मर्यादित सर्व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सत्कार कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन या मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रवि जाधव यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा 9405163107, 7249202691 असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page