कुडाळ येथे उद्या महारथी कर्ण नाट्यप्रयोग

नितीन आसयेकर फॅन क्लबतर्फे ४ थ्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजन

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: : नितीन आसयेकर फॅन क्लब आयोजित ४ थ्या वर्धापनदिनानिमीत्त उद्या शनिवार २५ जुन रोजी वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे सायंकाळी ६.०० वाजता ‘महारथी कर्ण’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.


या नाट्यप्रयोगात दशावतार क्षेत्रातील तीन पिढ्य एकाच रंगमंचावर अभिनयाचा आविष्कार साकारणार आहेत. यात महारथी कर्णाची भुमिकेतअभिनयकुमार नितीन आसयेकर साकारणार आहेत. तर गणपती: संदीप दळवी रिध्दी सिध्दी दिनेश मांजरेकर, शल्य: यशवंत तेंडोलकर, कृष्ण : विलास तेंडोलकर कुंती : ओमप्रकाश चव्हाण, शकुनी दादा राणे कोनसकर, दुर्योधन बाबा कामत, दुःशासन व ब्राह्मण राजन गावडे, वृषाली : गौतम केरकर, अर्जुन: भरत नाईक, धर्म: महेंद्र कुडव, वृषसेन सागर गावकर आदी कलाकार भुमिका सकारणार आहेत. त्यांना मधुर चावळी (हार्मोनियम), किसन नेमळेकर (पखवाज) विनायक सावंत (झांज) आदी संगीतसाथ
करणार आहेत. या नाट्यपुष्पाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नितीन आसयेकर फॅन क्लबतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page