आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पं.स.गटात विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.२३-: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचायत समिती गटात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले आहे. यामध्ये असलदे वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे व जिलेबी वाटप,नांदगाव तिठा येथे शेतकरी बांधवांना जेलिबी आणि रक्त चंदन झाडे वाटप, नांदगाव मधील जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके , तालुका सरचिटणीस पंढरी वायगंणकर,नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर,आयनल सरपंच बापू फाटक, शेरपे सरपंच निशा गुरव,सरिता परब,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,सुशील इंदप,असलदे उपसरपंच संतोष परब,नांदगाव उपसरपंच नीरज मोरये,बूथ अध्यक्ष कमलेश पाटील,राजू खोत, पर्शूराम परब,राजू तांबे,जाफर कुणकेरकर,आनंद गगणग्रास,भूषण म्हसकर,मंदार कुलकर्णी,मारुती मोरये,एकनाथ मोरये, शैलेश टाकळे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page