*ओझर कातवड रस्त्याच्या दुर्दशेबाबत २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण

माजी सरपंच सुनील मलये आणि ग्रामस्थांचा इशारा*

मालवण-: वाहतुकीस धोकादायक बनलेल्या ओझर कातवड रस्त्याच्या दुरुस्ती बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग,कर्यालयाला माहिती देऊन हि अद्याप धोकादायक रस्त्याच्या दुरुस्ती बाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने येत्या २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा माजी सरपंच सुनील मलये आणि कातववाडी ग्रामस्थांनी दिला आहे. कोळंब पूल वाहतुकीस धोकदायक बनल्या नंतर पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून ओझर- कातवड खैदा या मार्गावरून मोठ्याप्रमाणावर वाहतूक सुरु होती.यावेळी या पर्यायी मार्गाची प्रमाणावर दुरावास्ता झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी कोळंब ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे रस्त्याच्या दुरुस्ती बाबत लक्ष वेधले होते. मात्र निधी अभावी रस्त्याचे काम रखडले होते.मात्र अधिकारी, ग्रामस्थ यांच्या वारंवार मागणी नंतर जिल्हा नियोजन च्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला होता. मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. दरम्यान, कोरोनो कालवधीत सर्व विकास कामे ठप्प असल्याने या पर्यायी मार्गाचे हि काम करण्यात आले नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आता केंद्र शासने विकास कामांना मंजुरी दिल्याने विकास कामे सुरु आहेत. ओझर-कातवड खैदा मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत माजी सरपंच सुनल मलये यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधले असता ग्रामपंचायत कोळंब ला पर्यायी मार्ग ओझर कातवड खैदा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या लेखी पत्राद्वारे सूचना केल्या होत्या मात्र काम करण्याची मुदत संपली तरी रस्त्यच्या दुरुस्ती बाबत कोणतेही नियोजन ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्या कडून झाले नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा श्री. मलये व कातवड वाडी ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत मालवण तहसीलदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page