वरदा सावंत 98.60 टक्के गुणांसह प्रथम…
सावंतवाडी ता.१७-:
महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल 100 टक्के लागला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधून एकूण 125 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये सावंत वरदा तानाजी हिने 98.60 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर चव्हाण अदिती दिनेश हिने 97.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक पटवर्धन समीर मयुरेश याने 96.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थाचे प्रशालेच्या वतीने संस्थाध्यक्ष विकासभाई सावंत, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री धोंड सर, उपप्राचार्य नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक नाईक सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
