बांदा ग्राम पंचायत सदस्य राजाराम सावंत यांची मागणी
बांदा/प्रतिनिधी
सरकारमान्य रास्त धान्य दुकानावर मशीन द्वारे धान्य वितरण करताना अंगठा न लागल्याने धान्य वितारणास अडचणी निर्माण होतात. याचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील जनतेला होत असल्याने ऑफलाईन धन्यवाद वितरणास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. आपण वेळीच लक्ष देऊन त्यासंदर्भात प्रशासनास सूचना देण्याचे आश्वासन मंत्री नाईक यांनी दिले.
. नेटवर्क समस्या व भौगोलिक अडचणींमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन धान्य वितरण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावर तात्काळ उपाययोजना करावी यासाठी महसूल प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती. मात्र प्रशासकीय पातळीवर याची दखल घेण्यात न आल्याने अनेक नागरिकांना धान्य वितरणपासून वंचित राहावे लागले. श्री सावंत यांनी यासंदर्भात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे लक्ष वेधले.
. मंत्री नाईक यांनी महसूल प्रशासनाशी चर्चा करत तात्काळ यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
