जिनेव्हा येथे ज्योती तोरसकर मच्छीमारांचे मांडणार प्रश्न

देशातील ३४ मच्छीमारांचे शिष्टमंडळ दाखल:१२ पासून सुरू आहे जागतिक मच्छीमार बैठक

मालवण ता.१५-:
मच्छिमारांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे, अशी भूमिका जागतिक व्यापार संघटनेने मांडली आहे. त्यासाठी भारता सारख्या विकसनशील देशांना सबसिडी बंद करण्याबाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युरोपातील जीनेव्हा (स्वित्झर्लंड) याठिकाणी १२ जून ते १५ जून दरम्यान होणाऱ्या जागतिक मच्छिमार संघटनेच्या बैठकीत भारतातील मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी देशातून ३४ मच्छीमारांचे शिष्टमंडळ जीनेव्हा येथे पोहोचले आहे. यामध्ये मालवण येथून सौ. ज्योती रविकिरण तोरसकर यांचा समावेश आहे.

मच्छीमाराना राज्य व केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना जाहीर होत असतात. शाश्वत मासेमारी आणि रोजगार निर्मिती तसेच देशाचे परकीय चलन वाढावे यासाठी सदर योजनांवर अगदी ७५% पर्यंत अनुदान दिले जाते. ट्रॉलरना डिझेल सबसिडी असो अथवा पारंपारिक रापण व्यवसायिकांना जाळी खरेदीसाठी किंवा मत्स्यवाहतुकी साठी वाहनांना, मत्स्यपालन करण्यासाठी, मच्छीमाराना बंदी कालावधीतील अनुदान, विमा संरक्षण अशा अनेकविध योजनांसाठी सदरची सबसिडी दिली जाते. चांदा ते बांदा, निलक्रांती, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व इतर अनेक योजनांमार्फत त्याचा लाभ मच्छीमार, मत्स्य व्यवसायिकांना मिळत असतो. मात्र मच्छिमारांना शासनाकडून मिळणाऱ्या या विविध प्रकारच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे, अशी भूमिका जागतिक व्यापार संघटनेने मांडली आहे. त्यामुळे जीनेव्हा याठिकाणी १२ ते १५ जून दरम्यान होणाऱ्या जागतिक मच्छिमार संघटनेच्या बैठकीत भारतातील मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी मच्छीमारांचे शिष्टमंडळ जीनेव्हा येथे पोहोचले आहे. यामध्ये सौ. ज्योती रविकिरण तोरसकर यांच्या बरोबरच महाराष्ट्रातून गणेश नाखवा, अमोल रोगे, मोरेश्वर वैती यांचा समावेश आहे. सौ. ज्योती यांनी आमची मासेमारी ही उपजीविका साधन असून त्याच्यावरील सबसिडी बंद केल्यास त्याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या अर्थ आणि कुटुंब व्यवस्थेवर होईल अशी भूमिका या बैठकीत मांडली. तसेच समुद्र आमचे दैवत असून त्याला ओरबडण्याचं काम आमच्या मच्छीमारांकडून कधीही होणार नाही असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे विविध मच्छीमार संघटनानी स्वागत केले आहे. भारतातून सदर बैठकीत सहभागी असलेल्या चार महिलांमध्ये सौ. ज्योती तोरसकर यांचा समावेश आहे.

फोटो

जीनेव्हा येथे जागतिक मच्छिमार संघटनेच्या बैठकीत भारतातील मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी सहभागी झालेल्या सौ. ज्योती रविकिरण तोरसकर व इतर प्रतिनिधी

You cannot copy content of this page