दुर्गंधीमुळे नागरिक हैराण:माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली पाहणी
⚡सावंतवाडी ता.१५-: येथील इंदिरा गांधी संकलनाच्या परिसरात नगरपरिषदेच्या मागच्या बाजूस असलेले स्वच्छतागृह गेले अनेक महिने अत्यंत अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त अवस्थेमध्ये आहे यामुळे तेथील नागरी व्यवसायिक हैराण झाले असून माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज “त्या” ठिकाणी भेट देत स्वच्छतागृहाची पाहणी केली.
यावेळी अनेक त्रुटी निदर्शनास येतात त्यांनी जमलेल्या व्यापाऱ्यांना घेऊन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत चर्चा केली यावेळी येत्या दोन दिवसात यावर योग्य उपाययोजना केल्या जातील तसेच काही दिवसातच नवीन सुलभ स्वच्छतागृह बाजूला बांधण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.
