विष्णू मोंडकर यांचा केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला सरकार

कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी निवड झाल्याने केला गौरव

मालवण ता.१५-:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी विष्णू मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. व्यावसायिक महासंघाच्या जिल्ह्यातील करत असलेल्या कार्याची दखल घेत चेंबर अध्यक्ष ललित गांधी यांनी ही निवड केली. या निवडीनंतर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी मोंडकर यांचा सत्कार केला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चर ही संस्था व्यापारी वर्गाची शिखर संस्था असून या संस्थेने राज्य व केंद्र सरकारच्या व्यापारी वर्गास आवश्यक असलेल्या अनेक शासकीय पॉलिसी बनविण्यामध्ये मध्ये मोठे योगदान आहे चेंबरच्या माध्यमातून राज्यात उद्योग व्यवसाय बरोबर महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रात अग्रेसर व्हावे यासाठी चेंबरचे नूतन अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या सुचनेप्रमाणे राज्य पर्यटन समिती गठीत करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन समिती अध्यक्ष पदी संतोष तावडे यांची निवड करण्यात आली असून पर्यटन कार्यकारणी सदस्य म्हणून कुडाळ येथील व्यावसायिक राजन नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करत असताना संपूर्ण राज्याचे प्रश्न वेगळे असून कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी असलेला पर्यटन व्यावसायिक मूलभूत व्यावसायिक सुख सुविधांसाठी झगडत असल्याचे चेंबर अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या लक्षात आल्याने कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पर्यटन समिती गठीत करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या राज्यातील तीन जिल्ह्याचा समावेश असून गोवा राज्य व बेळगावचा समावेश आहे.या समितीच्या प्रमुख पदी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जिल्ह्यातील करत असलेल्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांची चेंबर अध्यक्ष ललितजी गांधी यांनी निवड केली असून मालवण येथे नुकत्याच झालेल्या पर्यटन चर्चासत्र कार्यक्रमात महाराष्ट्रर चेंबर कोकण रिजन अध्यक्ष राजू पुनाळेकर यांच्या उपस्थितीत केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णू मोंडकर यांनी सांगितले की कोकणातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिकांच्या कित्येक वर्षे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page