⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी मालवण तालुका पत्रकार समितीचे सदस्य महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या ठरावाला प्रशांत हिंदळेकर सूचक तर अमित खोत यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मालवण तालुका पत्रकार समितीची सभा अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, अमित खोत, मनोज चव्हाण, दत्तप्रसाद पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर, महेश सरनाईक, कुणाल मांजरेकर, समीर म्हाडगूत, संदीप बोडवे, अमोल गोसावी, गणेश गावकर, नितीन गावडे, विशाल वाईरकर, संतोष हिवाळेकर, नितीन आचरेकर, केशव भोगले, आपा मालंडकर, आदी उपस्थित होते.