⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅक्टरच्या सहाय्याने मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस सुरुवात केली आहे.
आता भात पेरणी केल्याने मान्सूनच्या पावसास सुरुवात होताच लावणीस सुरुवात करणार असल्याने शेतकऱ्यांनी जोर धरला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतीची कास सोडून शेतकऱ्यांचा कल आधुनिक श्री पद्धत शेतीकडे वळला आहे. काही ठिकाणी पेरणी चालू आहे, तर काही ठिकाणी पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी शेतीच्या ईतर कामात व्यस्त झाले आहेत.
