याला जबाबदार कोण ?;बाळ कनयाळकर यांचा प्रश्न
⚡कुडाळ ता.१५-: पिंगुळी येथील शासकीय उप आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था पाहीली असता सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला असून याला जबाबदार कोण?असा सवाल जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब कनयाळकर यांनी प्रशासनाला विचालेला आहे,
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असुनही या अत्यावश्यक बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष का ? निद्रावस्थेत असलेला आरोग्य विभाग आता तरी जागा होऊन या इमारतीच्या बाबतीत दुरुस्तीचा निर्णय घेईल का..?असा सवाल बाळा कनयाळकर यांनी विचारला असून राज्याचे आरोग्यमंत्री मा,राजेश टोपे यांचे लक्ष वेधून यात हलगर्जीपणा करून जनतेच्या जीवाशी खेळत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळ कनयाळकर यांनी सांगितले,
