थोडगे कुटुंबीयांचे आ नितेश राणे यांनी केले सांत्वन

कोळपे येथील अपघातात बहीण भावाचा झाला होता मृत्यू

वैभववाडी प्रतिनिधी
मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोळपेतील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आमदार नितेश राणे यांनी थोडगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती बाळा हरयाण, उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, रज्जब रमदुल व कोळपे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

शनिवारी सकाळी सोनाळी येथे मोटरसायकल व मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मुख्तार महम्मद थोडगे वय 18 रा. कोळपे व मोमीना उस्मानगणी नावळेकर वय 22 रा. नांदगाव या बहिण-भावाचा जागीच अंत झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला तर कोळपे गाव सुन्न झाला होता. आमदार नितेश राणे यांनी मयत मुख्तार याचे वडील महम्मद थोडगे व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

You cannot copy content of this page