राज ठाकरे यांच्या वाढनिमित्त मनसेचा उपक्रम
⚡कणकवली ता.१४-:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने कणकवली तालुक्यातील कसवण सोनारवाडी येथे दोन सोलर लाईट लोकार्पण करण्यात आले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवलीतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना बिस्किट वाटप करण्यात आले .
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिरवाडकर ,कणकवली तालुका सचिव संतोष कुडाळकर ,उपतालुका अध्यक्ष शांताराम सादये, अरविंद घाडीगावकर प्रशांत उपरकर ,सुनील सोनार, विभाग अध्यक्ष रणजीत सावंत, प्रिया सावंत तसेच कसवण सोनारवाडी व मेस्त्रीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी मनसेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
.
