कणकवलीत खतांच्या टंचाईने
शेतकरी सापडला अडचणीत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांची सुरुवात झाली आहे.मात्र,कणकवली तालुक्यातील अनेक विकास संस्थांना खत पुरवठा करण्यास विलंब होत आहे.हा खत पुरवठा खरेदी विक्री संघाकडून केला जातो,मात्र,त्यांच्याकडे आरसीएफ या कंपनीकडून युरिया व सुफला खतांचा पुरवठा विलंबाने होत आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात खत वाहतुकीचे काम आरसीएफ कंपनीने एका ठेकेदाराला दिले आहे,मात्र,त्याच्याकडे वाहनांची अपुरी व्यवस्थेमुळे पुरवठा उशिराने होत आहे.त्याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे.


शेतकरी पाऊस पडण्याअगोदर डोंगराळ भागातील, जंगलातील असलेल्या काजू ,आंबा बागांमध्ये वाहनाने खत घेऊन जात असतात. मात्र पाऊस सुरु झाला तरी अद्याप खताचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.या कृत्रिम निर्माण झालेला खत टंचाईला जबाबदार कोण असा सवाल शेतकरी करत आहे.

शासनाच्या धोरणानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खत मागणी विकास संस्थांकडून तालुक्यातील कणकवली खरेदी विक्री संघाकडे केली जाते. त्यानंतर खरेदी विक्री संघामार्फत खताची मागणी आरसीएफ व जुआरी कंपनीकडे केली जाते.आरसीएफ कंपनी कडून रत्नागिरी येथे खतांची उपलब्धता केली जात आहे.मात्र,वाहतूक करत दोन जिल्हाकडे खताचा पुरवठा करणारा ठेकेदाराकडे वाहनांची अपुरी व्यवस्था आहे.त्याचा फटका सर्वांना बसला आहे.त्यात शेतकरी संघांकडे त्या ठेकेदाराने खत उतरण्यासाठी हमाली सोबत चालू वर्षी वारणी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे,अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page