राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांचा मित्रत्वाचा सल्ला : नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी करावी लागते धडपड
⚡सावंतवाडी ता.११-: गेले अनेक वर्ष आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांना आता पुन्हा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी धडपड करावी लागते हे कुठेतरी त्यांच्या मनाला खुपसत असून त्यामुळे ते आता महाविकास आघाडीवर टीका करत आहेत तसेच महाविकास आघाडीला पाच जागेवर समाधानी राहावे लागणार असे संजू परब यांनी सांगण्यापेक्षा त्यांनी आपली स्वतःच्या पक्षाकडून आमदारकीसाठी उमेदवारी मिळणार की नाही याचा विचार करावा असा मित्रत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दिला आहे.
काल श्री परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महा विकास आघाडीवर टीका केली होती. त्याला पुंडलिक दळवी यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
