तालुक्यात मान्सूनची हजेरी ः शेतक-यांतून समाधान

⚡वेंगुर्ला ता.१०-: बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने वेंगुर्ला तालुक्यात आज दुपारनंतर वा-यासह दमदार हजेरी लावली. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

  गेल्या काही दिवसापासून अनियमित पडणा-या पावसामुळे शेतकरी राजा चितेत होता. पाऊस लांबल्याने उन्हाळाही कडक जाणवत होता. अधूनमधून पावसाची हजेरी असली तरी अल्पच होती. काहीवेळा ढग भरुन येत असतानाही पाऊस हुलकावणी देत होता. आज शुक्रवारी मात्र, जोरदार पावसाने बरसायला सुरुवात केली. हा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरुच राहिल्याने मान्सून दाखल झाल्याची चर्चा नागरिकांमधून होती.
You cannot copy content of this page