दोन टप्प्यात होणार मतमोजणी; पहिल्या टप्प्यात ६ तर दुसऱ्या टप्प्यात ५ ग्रामपंचायत*
*💫सावंतवाडी दि.१८ -:* ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी १० वाजता मत मोजणीला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी ६ टेबलवर होणार आहे. पहिल्या टप्प्यात मळगाव, तळवडे, इन्सुली, आरोस, कोलगाव, डिंगणे या सहा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार असून, दुसऱ्या टप्प्यात आंबोली, मळेवाड, चौकुळ, आरोंदा, दांडेली या पाच ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे.
