कोलगाव ग्रामपंचायत कोणाची…?

मायकल डिझोजा की महेश सारंग…?

थोड्याच वेळात चित्र होणार स्पष्ट

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचे मतदान शुक्रवारी पार पाडल्यानंतर आज मतमोजणी होणार असून साऱ्यांचं लक्ष मात्र संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीकडे लागले आहे. कारण कोलगावात शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा व भाजप नेते महेश सारंग यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून दोघांनीही विजय आपलाच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे नेमकी आता कोलगाव ग्रामपंचायत कोणाची..? याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोलगाव वासीय जनता पुन्हा एकदा मायकल डिसोजा याना साथ देते की, परिवर्तन घडवत महेश सारंग यांना साथ देते याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे.

You cannot copy content of this page