उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली ; तालुक्यात वर्चस्व कोणाचे?; आज होणार स्पष्ट
*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर आज कौल काय लागतोय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, निवडणुकीस उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. काही ग्रामपंचायत सोडल्यास इतर सर्वच ग्रामपंचायतीत थेट सेना – भाजप मध्ये लढत झाल्याने नक्की कोण वरचढ ठरतंय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत. अंदाजे आज दुपारी १२ वाजेपर्यंत ११ ही ग्रामपंचायतीचे निकाल हाती येण्याची शक्यता असून, ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकतो की, भाजपचे कमळ फुलते यावर संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सेना आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत बाजी कोण मारतो हे आज काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
