कणकवली मध्ये कलमठ आणि वागदे येथे चोरीचा प्रयत्न

कलमठ येथील बंद घरातील एक सिलिंडर चोरीस

कणकवली : कणकवली शहारालगत कलमठ कोष्टीवाडी येथे शनिवारी मध्यरात्री बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. असाच प्रकार वागदे येथे घडला असून एक वडापावचा स्टॉल फोडला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कलमठ कोष्टीवाडी येथील श्रीकांत शांताराम बुचडे यांच्या वडिलांचे घर तळमजल्यावर आहे. वडील बाहेर गावी गेल्याने घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात शिरकाव केला. तसेच खोलीतील कपाट फोडून काही मूल्यवान वस्तू किंवा पैसे शोधण्याचा प्रयत्न केला . मात्र काही सापडून आले नसल्याने चोरट्यांनी घरातील दोन गॅस सिलेंडर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक सिलेंडर चोरून नेला व दुसरा अंगणालगत तिथेच टाकला आहे. या दरम्यान वरती राहत असलेल्या श्रीकांत बुचडे यांच्या घराच्या दाराला चोरट्यांनी बाहेरून कडी घातली होती. कलमठ परिसरात वारंवार होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वागदे येथे ही एक वडापाव स्टॉलचे कुलूप फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजून येत आहे. या घटनांची कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजू शकली नाही.

You cannot copy content of this page