पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सागरी सुरक्षा बैठकीत आवाहन
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील सागरी सुरक्षा रक्षक दल आढावा बैठक शनिवारी येथील पोलिस स्थानकात संपन्न झाली. यावेळी पावसाळाच्या अनुषंगाने सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. किनारपट्टी भागातील सागरी सुरक्षेबाबत पावसाळ्यात उद्भवणा-या धोकादायक परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक त्या दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.
या बैठकीस योगेश तांडेल (हरिचणगिरी), सूर्यकांत गांवकर (सागरतीर्थ), सुहास तोरसकर (वायंगणी), परेश मलबारी (केरवाडी), फर्नांडीस (वेंगुर्ला बंदर), जगन्नाथ खवणेकर (मोचेमाड), संतोष साळगांवकर, घनःश्याम तोरसकर (वायंगणी), विष्णू पेडणेकर, गजानन कुबल, मनोहर साळगांवकर, तुकाराम तोरसकर, मनोज परुळेकर (उभादांडा) आदी सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
