प्रभाग सहामध्ये वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे औचित्य;नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मृणाली भडसाळे यांचा पुढाकार

देवगड ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या वतीने देवगड जांमसंडे नगरपंचायत प्रभाग क्र ६ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर ,महिला तालुका संस्था अध्यक्ष सौ मृणाली भडसाळे यांच्या संकल्पनेतून पार पडला.

यावेळी मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे,करनिर्धारण अधिकारी उमेश स्वामी,भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,वसंत शाहाकार ,कौस्तुभ जामसंडेकर,सखाराम भागवत ,रविकांत शिवलकर,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले, संतोष मेस्त्री,दीपक पाटील,जय गुरव,अभिषेक वडार,विराज नारकर,उपस्थित होते . प्रभाग क्र ६ मध्ये एकूण ४० झाडे लावून संपूर्ण टिळकनगर परिसरातील मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

त्यातील पहिल्या टप्प्यातील २० झाडे वृक्षारोपण रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यात बाभूळ,गुलमोहर,बदाम,कडुनिंब या वृक्षाचा समावेश आहे.हे वृक्षारोपण या प्रभागातील प्रत्येक इमारतीच्या समोरच्या रस्त्या नजीक भागात करण्यात आले असून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी नजीकच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास व जागतिक पर्यावरण दिवस शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच मान्यवर व नगरातील नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

You cannot copy content of this page