सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन
देवगड ता.०५-: देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ७ पेट्रोलपंप वरील व्यवस्थापक व आजूबाजुच्या परिसरातील नागरिकाना विशेषतः लोक वस्तीतील लोकांना पेट्रोल पंप सुरक्षा बाबत आवश्यक त्या सूचना देवगड पोलीस स्थानकाच्या वतीने पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी दिल्या.
तसेच सुरक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.या बरोबरच आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची दक्षता या बाबत संबंधित पेट्रोल पंप चालक मालक यांना लेखी सूचना पत्र देण्यात आली आहेत..
