पुणे येथील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी संघाची दमदार कामगिरी

एम् क्रिकेट अकादमी अध्यक्ष उदय नाईक यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी ता.०३-:* पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रितांच्या सिंधुदुर्ग विरुद्ध रत्नागिरी झालेल्या सामन्यात एम् क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी च्या खेळाडूंनी फलंदाजी गोलंदाजी चे उत्कृष्ट प्रदर्शन केले या सर्वांचे एम क्रिकेट ॲकॅडमी अध्यक्ष उदय नाईक उपाध्यक्ष अक्रम खान प्रमुख प्रशिक्षक राहुल रेगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी विरुद्ध गोलंदाजी करताना आर्यन गगनरास याने चार बळी घेतल्या तर आर्यन दूधवाडकर व मंथन कांबळी याने प्रेत्त्येकी 1 बळी घेतला झालेल्या या सामन्यात रत्नागिरी संघाने कमाविलेल्या 275 धावांचा सिंधुदुर्ग संघाने पाठलाग करताना 348 धावांवर डाव घोषित केला यात एम ऍकॅडमीच्या विश्वनाथ उर्फ प्रज्ञेश राहुल रेगे याने 128 118 धावा केल्या व सामील खतीब याने 106 चेंडूत 85 धावा केल्या तसेच आर्यन दुधवडकर याने 64 चेंडूत 24 धावा केल्या दिवसांतील 90 षटकांचा मारा संपून सामना अनिर्णीत राहिला.

You cannot copy content of this page