सचिन सावंत याने सहकुटुंब आमदार नितेश राणेंची घेतली भेट

अपघातात दोन्ही पायांना आले होते अपंगत्व;उपचारासाठी नितेश राणेंनी केली मदत

*💫कणकवली दि.१७-:* अपघातात दोन्ही पायांना अपंगत्व आल्यानंतर जर्मन फूट लावून बावशी गावातील सचिन सावंत हा युवक स्वतः चालू लागला…आणि कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर येत सचिनने आपल्याला उपचारांसाठी मदत करून पायांचे बळ देणाऱ्या आमदार नितेश राणेंची साश्रु नयनांनी सहकुटुंब भेट घेतली. फेब्रुवारी २०२० मध्ये कणकवली तालुक्यातील बावशी गावच्या सचिन सावंत या तरुणाचा गंभीर अपघात झाला. या अपघातात सचिनचा डावा पाय अर्धा तुटला तर उजव्या पायाचा तळव्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघाताने सचिनचे आयुष्य आणि कुटुंब उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे होते.अशा वेळी आमदार नितेश राणे सचिन सावंतच्या पाठीशी उभे राहिले. आमदार नितेश राणे यांनी सचिनवर मुंबईतील नानावाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले. चेंबूरमधील ऑटो बॉक सेंटर मध्ये ७ जानेवारीला सचिनला जर्मन फूट लावण्यात आले. आणि सचिन स्वतः वॉकर च्या सहाय्याने चालू लागला. मुंबईहून जर्मन फूट बसवल्यानंतर आज कणकवलीत येत सचिनने सर्वप्रथम आमदार नितेश राणे यांची सहकुटुंब भेट घेतली. आमदार नितेश यांचे हात हातात घेत अगदी गदगदलेल्या स्वरात नितेश यांचे आभार मानले. यावेळी सचिनच्याही नकळत त्याचे डोळे अश्रूंनी ओथंबले…सचिनच्या डोळ्यांतील हे आनंदाश्रू अव्यक्तपणे आमदार नितेश राणेंचे आभार मानत होते. आमदार नितेश राणे यांनीही सचिनच्या पाठीवर धीराची थाप देत ‘ मी आहे पाठीशी ‘ म्हणत सचिनला विश्वास दिला. सचिनची पत्नी सांवी, मुलगा अन्व आणि समीर मयेकर हेही सदगदीत झाले. यावेळी उपस्थित्यांचेही डोळे नकळत पाणावले होते. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, जि प बांधकाम सभापती बाळा जठार, पं स सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पं स सदस्य मिलिंद मेस्त्री, भाजपा जिल्हा प्रसिद्धिप्रमुख बबलू सावंत,माजी तालुकाध्यक्ष राजन चिके, माजी सभापती प्रकाश सावंत, भालचंद्र साटम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page