*💫मालवण दि.१७-:* आविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर, महाराष्ट्र) यांचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई गुणवंत शिक्षिका पुरस्कार वैभववाडी येथील संकेता संतोष तांबे तथा पूर्वाश्रमीच्या उषा पांडुरंग मुणगेकर (रा. मुणगे, देवगड देवगड) यांना गणपतीपुळे येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. गणपतीपुळे तीर्थक्षेत्री प्रसिद्ध साहित्यिक, कवी, प्राध्यापक किसनराव कुराडे, बालकवी श्याम कुरळे, रत्नागिरी डाएटचे अधिव्याख्याता रमेश कोरे, आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला कोकण विभागीय अध्यक्ष आबासाहेब पवार, कोकण उपाध्यक्ष विजय केळकर, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर, रायगड जिल्हाध्यक्ष संदीप नागे तसेच सत्कार मूर्ती शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. संकेता संतोष तांबे या पदवीधर शिक्षिका म्हणून जि. प. केंद्रशाळा सुकोंडी नं १ (ता. दापोली, रत्नागिरी) येथे कार्यरत आहेत. त्यांनी मुलांचा सर्वागिण विकास केला. स्कॉलरशिपमध्ये त्यांचे ५ विद्यार्थी मेरिटमध्ये आले होते. सुकोंडी शाळेत २०१९ स्कॉलरशिपला मेरिटमध्ये विद्यार्थी आला होता. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई गुणवंत शिक्षिका पुरस्कार वैभववाडी येथील संकेता तांबे यांना प्रदान…!
