बँक ऑफ महाराष्ट्र प्रबंधक प्रतीक फाले यांचे प्रतिपादन*
मालवण दि प्रतिनिधी जागतिक क्रमवारीत हिंदी भाषा चौथ्या स्थानी आहे. जागतिक भाषांमध्ये हिंदीचे मोठे स्थान आहे. हिंदी भाषा भारतासह अन्य देशातही संपर्काचे प्रमुख साधन आहे. हिंदी भाषेचे अस्तित्व चिरकाल टिकविण्यासाठी हिंदीकडे वैश्विक भाषा म्हणून पाहायला पाहिजे, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रतीक फाले यांनी केले. कट्टा वराडकर हायस्कूल येथे विश्व हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यगायन, कथाकथन, अनुवाद, भाषण, निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करताना बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेत्या स्पर्धकांना हिंदी विषयाशी संबंधित पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कांबळे, सूत्रसंचालन वाजंत्री, तर आभार सावंत यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रतीक फाले, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक राजा कौशिक गावडे, मुख्याध्यापक एन.के. कांबळे, शिक्षक संजय नाईक, एस.एस चांदरकर, हिंदी विषय प्रमुख बी.एम. वाजंत्री, पी.बी. कदम, आर.ए. सावंत, बी.व्ही. गावडे, सी.पी. कानूरकर, आदी उपस्थित होते. प्राथमिक विभाग – काव्यगायन-प्रथम देवदत्त गावडे (सातवी), द्वितीय निखिल कदम (आठवी), तृतीय श्रेया चांदरकर (सहावी), उत्तेजनार्थ जान्हवी देसाई (सहावी) समीक्षा गरुड (सहावी), कथाकथन – ध्रुवी भाट, द्वितीय श्रेया चांदरकर (सहावी), तृतीय अनुष्का बावलेकर (आठवी), उत्तेजनार्थ जान्हवी देसाई (सहावी) सिद्धी राऊत (आठवी), अनुवाद-प्रथम सानिया कुडतरकर, द्वितीय देवदत्त गावडे (सातवी), तृतीय जान्हवी देसाई, उत्तेजनार्थ पूर्वा मेस्त्री (आठवी) श्रेया चांदरकर. माध्यमिक विभाग अनुवाद-प्रथम प्राची गावडे (दहावी), द्वितीय समृद्धी गावडे (नववी), तृतीय सानिका वाईरकर (दहावी), उत्तेजनार्थ सानिया चव्हाण (नववी) ईशा कदम (दहावी), निबंध-प्रथम युतीका अंजनकर (दहावी), द्वितीय पूजा चव्हाण (दहावी), तृतीय मयुरी गावडे (दहावी), उत्तेजनार्थ सानिका चव्हाण (नववी) प्राची गावडे (दहावी), भाषण-प्रथम रश्मी पांचाळ (दहावी), द्वितीय निकिता मेस्त्री (नववी), तृतीय सायली कदम (दहावी), उत्तेजनार्थ सोनाली घाडीगांवकर (नववी) यश गावकर, उच्च माध्यमिक निबंध-प्रथम निशा गावडे, द्वितीय दर्शना राणे, तृतीय नेहा कदम, उत्तेजनार्थ साक्षी जावकर, चैताली हिर्लेकर, भाषण-प्रथम साक्षी जावकर, द्वितीय दर्शना राणे, तृतीय पूर्वा रेवडेकर, उत्तेजनार्थ सौरभ सहानी, आशा कवठणकर. फोटो कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे विश्व हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यगायन, कथाकथन, अनुवाद, भाषण, निबंध स्पर्धेतील विजेत्यांसमावेत मान्यवर
