शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांची टीका
सावंतवाडी ता.०१-:* रत्नागिरी जिल्ह्यात बारशू येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार नाही तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होईल, केवळ रोजगाराचे गाजर दाखवून हा प्रकल्प येथील तेज माथी मारला जात आहे भविष्यात रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे सांगितले.
तर औष्णिक प्रकल्पावर शिवसेनेत असताना भरभरून बोलणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आज मूग गिळून गप्प का? तर या प्रकल्पामुळे रोजगाराची वल्गना करत असाल तर केंद्रीय मंत्री स्त्री आपल्या खात्यातून गेल्या नऊ महिन्यात या ठिकाणी किती उद्योगांना चालना मिळवून दिली असा सवालही डाॅ. परुळेकर यांनी उपस्थित केला. रत्नागिरी येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प विरोधात परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, बारशू येथे होणार्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासाठी स्वागत सभा आयोजित करण्यासाठी भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना संजीवनी ठरेल अशी वल्गना माझ्याकडून केली जात आहे यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील एकूण 2 हजार गावातील तब्बल 50 हजार युवक-युवतींना रोजगार देणार असे भासविले जात आहे. मुळात रोजगाराच्या नावाने गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे,.
रिफायनरी प्रकल्प हा ऑटोमेशियन प्रकल्पामध्ये मोडतो या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त काम हे मशनरी तसेच वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केले जाते त्यामुळे या ठिकाणी शिपाई माळी आधी कामासाठी कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे की मला त्या ठिकाणी ही परप्रांतीय कामगार भरती करते त्यामुळे याठिकाणी बेरोजगारांची घोर फसवणूक होणार आहे. ते पुढे म्हणाले पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प हा रेड कॅटेगरी मध्ये सर्वात टॉप चा रासायनिक प्रकल्प आहे त्यामुळे पाणी वायू परेशान होण्याबरोबरच श्वसनाचे कॅन्सरचे विकार निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार नाही तर प्रत्यक्षात बेरोजगार उपलब्ध होणार आहे हा बेरोजगार म्हणजे मच्छीमारी संपुष्टात येणार आहे, आधीच येथील पारंपरिक मच्छीमार अडचणीत असताना या प्रकल्पामुळे मोठी हानी होणार आहे दुसरीकडे सौदी अरेबियातील मल्टीनॅशनल कंपनी व अबुधाबी पेट्रोल केमिकल कंपनी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे समुद्र वाटे कच्चे तेल आणून या ठिकाणी पेट्रोल डिझेल एलपीजी सीएनजी गॅस तयार करून तो पुन्हा परदेशात पाठवला जाणार आहे त्यामुळे कोकणाला या प्रकल्पाचा काहीच फायदा होणार नाही.
डॉ.परुळेकर म्हणाले, शिवसेनेत असताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी औष्णिक प्रकल्पाविरोधात भरभरून बोलत होते मात्र आता ते मूग गिळून गप्प का दुसरीकडे नारायण राणे केंद्रात मंत्री झाले त्यांच्याकडे असलेल्या लघु सुषमा व माध्यम खात्याच्या माध्यमातून येथील किती उद्योगांना चालना मिळाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
