सचिव श्रीकृष्ण आडेलकर
ओरोस ता.०१-:बुद्धीबळ खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्ग या संस्थेची २०२२ ते २०२७ या पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी श्रीकृष्ण आडेलकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष सुशिल निब्रे, कार्याध्यक्ष प्रदिप जोशी, खजिनदार नारायण केळूसकर, सदस्य नंदन वेंगुर्लेकर, शिवाजी शारबिद्रे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व निवनिर्वाचीत कार्यकारिणीचे बुद्धिबळ खेळाडू यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
