*💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव-पिंपळवाडी येथील महापुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी १७ जानेवारी रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीपर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा होणार आहे. यानिमित्त देवाला केळी, नारळ, ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री उशिरा मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. जत्रेस येणाऱ्या भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळून जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकऱ्यांनी केले आहे.
मळगाव येथील महापुरूष देवाचा आज जत्रोत्सव
