*💫सावंतवाडी दि.१७-:* खानोली सुरंगपाणी येथील विठ्ठल मंदिर येथे उद्या सोमवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘गोपुत्र गोकर्ण’ हा भगवत भक्तीवर आधारित ट्रिकसीनयुक्त पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यात धुंधूकारी-पप्पू नांदोसकर, गोकर्ण-पुरुषोत्तम कोचरेकर, आत्मदेव-पुरुषोत्तम खेडेकर, कुमुदिनी-नितीन घाडीगावकर, धुंधुली-बंड्या परब, सूर्यनारायण-कृष्णा माळकर, नारद-सचिन हडकर, कुंदन शेठ-सतीश केळुसकर, चित्राक्ष-सुंदर साटम आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियम-पप्पू घाडीगावकर, मृदंगमणी-बाबा मेस्त्री व चेतन मेस्त्री, तालरक्षक-विनायक सावंत संगीतसाथ करणार आहेत. या नाट्यप्रयोगात ग्रहमंडळात भ्रमण करणारा सूर्यनारायण, अंतराळात नारदाची भ्रमंती, सिद्धपुरुषाची रहस्यमय गुहा, रंगमंचावर गोमातेची प्रसूती (पुण्यसंचय करणारे दृश्य), गोमातेच्या उदरातून गोकर्णरूपी बालकाचा जन्म, पाण्यात भरलेल्या विहिरीत स्त्री चा शेवट, रंगमंचावर पेटलेली घरे, रंगमंचावर मानवी शरीराचे तुकडे, हृदयाचा थरकाप उडविणारा भुतांचा नंगानाच, वेळूच्या काठीच्या सात गाठी फुटून पिशाच्ययोनी बाहेर आदी रहस्यमयी ट्रिकसिन दाखविण्यात येणार आहेत. नाट्यप्रेमींनी या ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे
खानोली येथे उद्या खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘गोपुत्र गोकर्ण’ नाट्यप्रयोग…
