ड्रेन क्लीनर कंपनीच्या व्हॅनचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत लोकार्पण

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील खासगी, नगरपालिकेचे टॉयलेट साफ करण्याची निविदा कोल्हापूर येथील ड्रेन क्लीनर या कंपनीला मिळाली आहे. आज या सक्शन व्हॅनचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, ड्रेन क्लीनरचे निहाल खान, नगरसेवक आनंद नेवगी, भारती मोरे, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर, रसिका नाडकर्णी आदी उपस्थित होते. शहरवासीयांना कमी दरात याचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

You cannot copy content of this page