राम मंदिरच्या निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संजू परब यांनी दिले आश्वासन
*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचा बाबा बांदेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी राम मंदिरासाठी सावंतवाडी तालुक्यातून निधि गोळा करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न व सहकार्य करेन, असे आश्वासन दिले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, अभियानाचे जिल्हा संयोजक सतीश घोडगे, अभियानाचे तालुका संयोजक लक्ष्मीकांत कराड सर, मिहिर प्रभुदेसाई, सुधीर कशाळीकर, हेमंत खानोलकर, बाळ पुराणिक, गुरुप्रसाद चिटणीस, अण्णा म्हापसेकर, अमीत बांदेकर, धोंडी वरक, वर्षा मडगावकर, गुरुदास कामत आदी उपस्थित होते. तालुक्यातील जनतेने राम मंदीरासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन परब यांनी केले. तर मंदिर निर्माण निधि समर्पण अभियानचे जिल्हा संयोजक सतीश घोडगे यांनी राम मंदीर बाबत असलेला इतिहास सांगितला. राम मंदिराची निर्मिती का महत्वाची आहे, याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन धोंडी वरक तर आभार वर्षा मडगावकर यांनी मानले.
