*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे विद्यमान उपसरपंच गणेश लक्ष्मण घाडी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रा प सदस्य विजय केशव कुडपकर यांच्या नावाला सर्वांनी पसंती दिल्यामुळे विजय कुडपकर यांची कोटकामते ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
विजय कुडपकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर इनामदार श्री देवी भगवती संस्थांन कोटकामते चे अध्यक्ष गणेश घाडी ,व सचिव सुनील कामतेकर, सरपंच सायली पारकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले
