कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांची कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी
मालवण अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ बागायत दारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या बागायतदारांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या जवळ मालवण काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६ ते ९ जानेवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू, जांभूळ या झाडांचा मोहोर गळून पडला व आता काही प्रमाणात बुरशी धरल्याने यंदा पीक येऊ शकणार नसल्याने जिल्ह्यातील बागायतदारांना याचं नुकसान सहन करावे लागणार असून आर्थिक फटका बसणार आहे.त्यामुळे प्रती आंबाकलम किमान १० हजार- रुपये ची मदत घ्यावी असे मालवण तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांनी राज्याचे कृषी मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी लवकरच मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी व सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी यांच्या समन्वयातुन बागायतदारांना निश्चितच न्याय देऊ असे दादासाहेब भुसे यांनी मेघनाथ धुरी यांस सांगितले.अशी माहिती श्री मेघनाद धुरी यांनी दिली.
